×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार, येरवाड्यातील...

Pune Crime | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार, येरवाड्यातील घटना

पुणे : Pune Crime | पोलिसांचा खबरी (Informer Of Police Department) असल्याच्या संशयाने गुंडाने तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

मोहसिन अन्वर खान (वय ३२, रा. जिजामाता नगर, नवी खडकी – Navi Khadki) असे या गुंडाचे नाव असून येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी ऋषीकेश किरण मोहिते (वय २१, रा. नवी खडकी, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात
(Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुरुवारी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडला. मोहसिन खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहे.

फिर्यादी हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असताना मोहसिनने तो पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
कुर्‍हाडीने त्याच्या डोक्यात वार केला. तेव्हा फिर्यादी यांनी वार चुकविण्यासाठी हात मध्ये घातला असता कुर्‍हाडीने उजव्या हाताला जखमी झाली.
फिर्यादीचे आई वडिल त्याला वाचविण्यासाठी आले असताना त्यांच्या अंगावर कुर्‍हाड उगारली.
यावेळी लोक त्याला पकडण्यासाठी येऊ लागल्याने त्याने हातातील कुर्‍हाड हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
पोलीस निरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | A goon attacked a youth with an ax on the suspicion of being a police informant, an incident in Yerawada

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला भीषण आग, प्रवाशी सुरक्षित

Must Read
Related News