Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घातला घाव; शिवाजीनगर परिसरातील घटनेत मालकाच्या कवटीला इजा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन त्यांचा खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज ब्रिजजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj Bridge Pune) बुधवारी रात्री घडला. यामध्ये ज्युस सेंटरचे मालक हे गंभीर जखमी झाले असून हल्लेखोराने इतक्या द्वेषाने वार केला की त्यात त्यांची कवटी फुटली आहे. (Pune Crime)

हेमंत राजेंद्र कणसे Hemant Rajendra Kanse (रा. चौधरी वस्ती, खराडी) असे स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या मालकाचे नाव आहे. ही घटना शिवाजी पुलाच्या खालील ममता हॉटेलच्या बाजूला स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या समोर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

याप्रकरणी दीपक प्रल्हाद सोळंके (वय २३, रा. कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ५८/२२) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे हेमंत कणसे यांच्या स्वामी समर्थ ज्युस सेंटरवर काम करतात. बुधवारी रात्री ते व कणसे ज्युस सेंटरवर असताना एक जण आला. त्याने लोखंडी हातोड्याने हेमंत कणसे यांच्या डोक्यात, कानाजवळ, डोक्याच्या पाठीमागे एका मागोमाग एक असे तीन वार केले. त्यामुळे कणसे जखमी होऊन खाली पडले. त्यांना वाचविण्यासाठी दीपक धावले असताना हल्लेखोराने त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर हातोड्याने मारुन जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेला.

हल्लेखोराने तोंडाला रुमाल बांधला होता. तसेच त्याने रात्र असतानाही टोपी घातली होती. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वैयक्तिक कारणावरुन हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मोटारसायकलचा माग काढून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | A hammer blow to the head of the juice center owner; Injury of owner’s skull in Shivajinagar area incident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI