×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | लॉन्ड्री चालकाचा खून करुन मृतदेह फेकला डेक्कन परिसरातील नदीपात्रात,...

Pune Crime | लॉन्ड्री चालकाचा खून करुन मृतदेह फेकला डेक्कन परिसरातील नदीपात्रात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  लॉन्ड्री चालकाचा (Laundry) खून (Murder) करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह  (Dead Body) नदीपात्रात फेकून दिला. हा प्रकार आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) खुनाचा गुन्हा (FIR)  दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश कदम Ganesh Suresh Kadam (वय-35 रा. शनिवार पेठ, पुणे) असे खून झालेल्याचे (Pune Crime) नाव आहे.

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला आहे. पोलिसांनी तरुणाची ओळख पटवली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी केलेल्या तपासात गणेश कदम याचा लॉन्ड्री व्यवसाय असून त्याचे शनिवार पेठेत लॉन्ड्री चे दुकान आहे.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याला फोन आल्याने तो घरातून बाहेर पडला होता.
मात्र, त्यानंतर तो घरी आला नाही.
आज दुपारी एका सर्व्हिस सेंटर चालकाला नदीपात्रात झेडब्रीज जवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A laundry driver was killed and his body was thrown in a river in the Deccan area, causing great excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bile | पित्ताच्या त्रासापासून त्वरित आणि कायमचा आराम, नवजीवन सुख विरेचन चूर्ण

Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान

Chandrakant Patil | ‘मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे’ – चंद्रकांत पाटील

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News