Pune Crime | हत्याराचा धाकाने लिंबू सरबत विक्रेत्याला लुटले; 7 जण ताब्यात, खडकीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लिंबू सरबत विक्री करणाऱ्याला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी दिवसभर हातगाडीवर लिंबू सरबत विक्री करून जमा झालेले 1450 रुपये काढून घेत बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि.4) रात्री खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी 5 जणांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ( Pune Crime) ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत अलीहुसेन उर्फ टिपू हकीकअली शहा (वय 21) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयुष लांडगे (वय 19), व्यंकटेश सुरेंद्र स्वामी (वय 25), आकाश गोपाल देवर (वय 25), अमोल शिंदे (वय 25), अनिकेत उमेश राचहवार (वय 19) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल ( Pune Crime) करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खडकीमधील इंदिरानगर परिसरात राहत असून, लिंबू सरबत विक्रीचा व्यवसाय करतात.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास ते लिंबू सरबत विक्री करून हातगाडी ढकलत घरी जात होते.
त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून दमदाटी करत लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला.
तसेच दिवसभर लिंबू सरबत विक्री करून जमलेले 1450 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
इतकेच नाही तर आरोपींनी हातगाडीवरील काचेचे ग्लास आणि इतर साहित्य रस्त्यावर फेकून देत फिर्यादी यांना मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात