Pune Crime | ‘पतंजली’च्या नावावर सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा नवा फंडा

पुणे : Pune Crime | योगगुरु रामदेव बाबा (yog guru ramdev baba) यांच्या पतंजलीने (patanjali) देशभरात सध्या धुम आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी टक्कर देत त्यांची बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढत नेला आहे. त्याकडे आता सायबर चोरट्यांचे लक्ष गेले आहे. पतंजलीचे स्टोअर उघडून देतो, असे सांगून सायबर चोरट्याने एकाला ५ लाख ७० हजार रुपयांना गंडा (Pune Crime) घातला आहे.

याप्रकरणी एका ४६ वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे (chaturshringi police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०२० दरम्यान घडला. फिर्यादी यांना एक फोन आला होता. फिर्यादी व त्यांच्या भावाला पतंजली स्टोअर (patanjali store) एजन्सी चालू करुन देतो, असे सांगून त्यांना त्यासाठी वेळोवेळी बँक खात्यावर ५ लाख ७० हजार रुपये भरायला सांगितले. त्यानुसार त्यांनी शिवशंकर यादव, सुजीत कुमार यांच्या बँक खात्यावर पैसे भरले. त्यानंतरही त्यांना कोणत्याही प्रकारची एजन्सी मिळवून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन चतु:श्रृंगी पोलिसांकडे ((chaturshringi police)) हा गुन्हा वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक लांबतुरे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

International Call Fraud | ALERT ! ‘नो नंबर’ म्हणजे संकट, चुकूनही ‘रिसीव्ह’ करू नका असा कॉल, होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Modi Government | मोदी सरकारने लाँच केले ‘पीएम दक्ष पोर्टल’ ! रोजगाराला चालना देण्यासाठी दिले जाईल ‘कौशल्य’ प्रशिक्षण, जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | A new scam of fraud by cyber thieves in the name of ‘Patanjali’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update