Pune Crime | फ्री लॅपटॉपचा मोह पडला सव्वा लाखाला; कोंढवा पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घड्याळ कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून ५ हजार रुपये भरल्यास तुम्हाला लॅपटॉप (Laptop) फ्रीमध्ये मिळेल, या सांगण्याचा मोह न आवरल्याने एका तरुणाला तब्बल १ लाख ३४ हजार रुपये गमविण्याची पाळी आली. (Pune Crime)

 

याबाबत उंड्री येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८५/२२) दिली आहे. फिर्यादी यांना २१ मार्च २०२१ रोजी मोबाईलवर फोन आला. गो नॉईज (Go Noise) या घड्याळाच्या कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीची एक ऑफर चालू आहे. त्यामध्ये तुम्ही ५ हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक लॅपटॉप फ्री मिळेल, असे सांगितले. फिर्यादीकडून पेटीएम (Paytm) द्वारे तसेच आयसीआयसीआय बँकेचे अ‍ॅपद्वारे (ICICI Bank App) एक प्रोसेस करण्यास सांगितले. व त्यातून फिर्यादी यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार ६४६ रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते (Assistant Police Inspector Mohite) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A quarter of a lakh were tempted by the free laptop

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा