Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्ड्यावर छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर (Illegal Trades In Pune) सामाजिक सुरक्षा विभागाची (Pune Police Crime Branch SS Cell) धडक कारवाई सुरु आहे. हडपसर (Hadapsar) येथील वर्धमान टाऊनशिप बिल्डिंगमध्ये (Vardhman Township Building) सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर (Mataka Adda) सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ७ जणांवर कारवाई केली. (Pune Crime)

जुगार रायटर शाहरुख मन्सूर शेख (वय ४५, रा. सय्यदनगर, हडपसर), जुगार रायटर राजू अंबादास शेरला (वय २९, रा. ससाणेनगर, हडपसर) तसेच जुगार खेळणारे लक्ष्मण महादेव रामजी (वय ५८, रा. काळेपडळ, हडपसर), परशुराम बाळू काळे (वय ३८, रा. काळेपडळ, हडपसर), भागवत बालाजी दमनसोरे (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. जुगार अड्डा मालक बैजू बिनावत (रा. सातवनगर, हडपसर), मॅनेजर नितीन भस्मे (रा. दरवडे वस्ती, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला हडपसरमधील वर्धमान टाऊनशिप बिल्डिंगमध्ये मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलिसांनी (Pune Police) छापा टाकून तेथे जुगार घेणारे आणि खेळणारे अशा ५ जणांना ताब्यात घेतले. (Pune Police Crime Branch Raid On Gambling Den In Hadapsar)

त्यांच्याकडून रोख ३२५० रुपये, जुगार साहित्य, ५ मोबाईल असा २२ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

हि कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे (DCP Shriniwas Ghadge) यांच्या मार्गदर्शनखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस हवालदार कुमावत, पोलीस नाईक कांबळे, पठाण, केकाण, पोलीस शिपाई चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime | A raid on a gambling den by the Social Security
Cell of the Pune Police Crime Branch in Hadapsar

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त