Pune Crime | वीज वाहिनीचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार

पुणे – Pune Crime | उच्च दाब वीज वाहिनीचा धक्का (Electric Shock) लागून गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना रविवारी ( दि. ३०) सकाळी कात्रजमध्ये घडली. ऋषिकेश मंजुनाथ पुजारी Rishikesh Manjunath Pujari ( वय १४, रा. कर्वेनगर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. (Pune Crime)

मंजुनाथ पुजारी हे सिंहगड रोड परिसरातील एका दुकानात फर्निचरचे काम करतात. २३ ऑक्टोबरला कामानिमित्त ते कात्रजला आले होते. शाळेला सुट्टी असल्याने त्यांचा मुलगा ऋषिकेशही सोबत आला होता. तो बाहेर खेळत असताना लोंबकळणाऱ्या उच्च वीज वाहिनीचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते . तेथे उपचारादरम्यान रविवारी तो मरण पावला. भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharti Vidyapith Police Station) यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime)

महावितरणचे दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप

कात्रज परिसरात राजीव गांधी पंपिंग स्टेशन ते गोकुळनगरकडे जाणारी २२ केव्ही उच्च दाब वाहिनी खासगी सोसायटीच्या सीमा भिंतीनंतर गार्डनमध्ये अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Web Title :-  Pune Crime | A schoolboy was killed by an electric line

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

India Squad NZ Series | न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आहे कर्णधारपद

Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात

Mumbai Indians | ज्युनियर ‘एबीडी’नं केला ‘हा’ मोठा पराक्रम, मुंबई इंडियन्स झाली खुश