Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई

0
216
Pune Crime | A staunch criminal from Pune lodged in Kolhapur Jail; Action taken by CP Amitabh Gupta against 89 persons under MPDA Act till date
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत करणे, दंगा, विनापरवाना शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत 89 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) कारवाई केली आहे.

भूषण उर्फ संकेत आनंद तारु (वय 22, रा. भोईराज भवनजवळ, कसबा पेठ, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, पालघन, पिस्टल (Pistol) यांसारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यांसारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime)

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Senior Police Inspector Shabbir Sayyed) यांनी
वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करून
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात
(Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Crime)
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी केली.

Web Title :- Pune Crime | A staunch criminal from Pune lodged in Kolhapur Jail; Action taken by CP Amitabh Gupta against 89 persons under MPDA Act till date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड

Pakistan Webseries | सोशल मीडियावर होतोय ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजला प्रचंड विरोध; पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित