Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंढवा परिसरातील प्रसिद्ध हॉटेल पेंटहाऊसच्या (Hotel Penthouze, Mundhwa) 13 व्या मजल्यावरुन उडी मारुन वेटरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कामगाराने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन आपण आत्महत्या (Suicide) करीत असल्याचे म्हटले होते. हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसविले असल्याचे त्याने या व्हिडीओमध्ये (Pune Crime) म्हटले आहे.

 

अरविंदसिंग भूपालसिंग राठोड ऊर्फ राठोर (वय 26, रा. मेहाली, जि. बागेश्वर, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या वेटरचे (Hotel Waiter) नाव आहे. याप्रकरणी नीरजसिंग पानसिंग  मेहरा (वय २१, रा. विक्रोळी, मुंबई) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदसिंग हा मुळचा उत्तराखंडचा राहणारा आहे. मुंढवा परिसरातील एबीसी रोडवरील हॉटेल पेंट हाऊसमध्ये (Hotel Penthouze, ABC Road, Mundhwa) तो वेटर म्हणून एक महिन्यांपूर्वीच कामाला आला होता. बुधवारी रात्री 9 वाजता तो हॉटेलच्या टेरेसवर 13 व्या मजल्यावर गेला. तेथे उभा राहून त्याने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. त्यात त्याने आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले. यावेळी त्याने हॉटेलमधील काही लोकांवर आरोपी करीत त्यांनी आपले वाईट केले असून फसवून काही कामे करुन घेतल्याचे म्हटले आहे. तो टेरेसवर उभा असल्याचे पाहून काही जणांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली.

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अरविंदसिंग याला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला (Pune Crime) होता.
या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याचे नातेवाईक नीरजसिंग मेहरा हे मुंबईहून पुण्यात आले.
त्याने अपलोड केलेल्या फेसबुक व्हिडीओवरून अरविंदसिंग याने पेंटहाऊसमधील कोणाच्या तरी
त्रासाला कंटाळून  आत्महत्या केल्याचे दिसत असून त्याच्या मृत्युला पेंट हाऊस हॉटेल प्रशासन कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले (Pune Crime) आहे.
त्यानुसार, पेंट हाऊस हॉटेल प्रशासनावर (hotel penthouze administration) गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे.

 

हे हॉटेल राज्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाच्या खूपच जवळच्या मित्राच्या मुलाचे आहे अशी माहिती समोर येते आहे.
त्यांचे पुण्यात समर्थ पोलीस ठाण्याजवळ देखील हॉटेल आहे.

 

‘तो’ व्हिडीओ Facebook वरून ‘गायब’

आत्महत्येचा प्रकार समोर आल्यानंतर त्याने Facebook वर अपलोड केलेला व्हिडीओ गायब करण्यात आला आहे.
त्यामुळं त्या व्हिडीओचे गूढ वाढले आहे. व्हिडीओमध्ये वेटरने नेमके कोणावर आरोप केले आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A waiter commits suicide by jumping from the 13th floor of a hotel penthouze of mundhwa in Pune; Huge uproar over the filing of a crime against the hotel penthouze administration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा