Pune Crime | तपासणीसाठी आलेल्या महिलेचा डॉक्टराने केला विनयभंग; कोंढव्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या महिलेशी लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) डॉ. धाडीवाल (Dr. Dhaadiwal) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८०९/२२) दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील साळवे गार्डनसमोरील धाडीवाल पॉलिक्लिनीक (Dhadiwal Polyclinic) या हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी एक वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यात राहतात. त्या आजारी असल्याने तपासणीसाठी डॉ. धाडीवाल हॉस्पिटलमध्ये (Dr. Dhadiwal Hospital) आल्या होत्या. तेथील डॉक्टरांनी उपचाराच्या नावाखाली लज्जास्पद व अपमानास्पद वाटेल अशा पद्धतीने वर्तन करुन त्यांची पँट खाली खेचली. तेथे शरीरावर नको तेथे स्पर्श करुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (Assistant Police Inspector Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A woman who came for examination was
molested by a doctor; Shocking incident in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा