Pune Crime | दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, चौघांवर FIR तर एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकीचा हॉर्न (Bike Horn) वाजवला म्हणून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण (Beaten) केली. तसेच तरुणाच्या गाडीची हेडलाईट (Headlight) फोडून दुचाकीचे नुकसान केले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अजय भारत जाधव (Ajay Bharat Jadhav) याला अटक (Arrest) केली. तर तुषार शिंदे उर्फ बारक्या (Tushar Shinde alias Barakya), पापड्या Papadya (पूर्ण नाव माहित नाही) धम्मपाल उर्फ ढम्या (Dhammapal alias Dhamya) यांच्या विरुद्ध IPC 324, 323, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा (Pune Crime) दाखल केला.

 

याबाबत लखन उर्फ लक्ष्मण बसवराज गाडेकर Lakhan alias Laxman Basavaraj Gadekar (वय – 24 रा. राममंदिरा समोर, त्रिवेणीनगर, तळवडे – Talawade) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन अजय जाधव याला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.14) रात्री साडे आठच्या सुमारास सावरकर चौक, मोरेवस्ती चिखली (Morevasti Chikhali) येथे घडला. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र रुपेश ठाकूर (Rupesh Thakur) यांच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी सावरकर चौक येथे आल्यावर त्याठिकाणी रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे रुपेशने गाडीचा हॉर्न वाजवला. तू हॉर्न का वाजवतो, असे आरोपी म्हणाले. आम्हाला जायचय रस्ता सोड, असे फिर्यादी म्हणाले. त्याचा राग आल्याने आरोपींनी वाद घातला. तसेच फिर्यादी व त्यांचा मित्र रुपेश ठाकूर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

 

आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते जखमी झाले.
तसेच पुन्हा या रस्त्यावर दिसला तर याद राख अशी धमकी (Threat) आरोपींनी दिली.
तसेच रुपेश यांच्या गाडीचा हेडलाईट फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार पी. एस. परब (Police Constable PS Parab) करत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | A young man was beaten to death on the road for blowing the horn of a two wheeler FIR was lodged against four persons and one was arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा