Pune Crime | अवैध धंद्यांबाबत तक्रार केल्याने तरुणाला मारहाण करुन दिली जीवे ठार मारण्याची धमकी; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गेल्या काही दिवसात हडपसर पोलीस (Hadapsar Police) व सामाजिक सुरक्षा विभागाने (Department of Social Security) अवैध धंद्यांविरुद्ध (Illegal Business) मोठ्या प्रमाणावर कारवाई (Action) केली आहे. अवैध धंद्याबाबत तक्रार केल्यामुळेच या कारवाया झाल्या असा समज करुन घेऊन चौघा जणांनी तरुणाला लोखंडी रॉडने (Iron Rod) मारहाण (Beating) करुन जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. (Pune Crime)

 

याप्रकरणी सदानंद सर्जेराव आरण Sadanand Sarjerao Aran (वय २८, रा. माळवाडी, हडपसर – Hadapsar ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९२१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लखन जाधव (Lakhan Jadhav) त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मांजरी येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी अवैध धंद्याबाबत तक्रारी केल्याची माहिती लखन जाधव याला मिळाली होती.
या कारणावरुन लखन व त्याच्या तीन साथीदारांनी सदानंद आरण याला गाठून शिवीगाळ केली.
हाताने मारहाण केली. लखन जाधव याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर, मानेवर मारुन जखमी केले.
जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी फिर्यादीला सोडविण्यासाठी धनंजय कांबळे (Dhananjay Kamble) व शाम पाटोळे (Sham Patole) आले असताना त्यांनाही हाताने मारहाण केली. पोलीस हवालदार डेरे (Police Constable Dere) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | A young man was beaten up and threatened with death for complaining about illegal activities FIR in Hadapsar Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा