×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

Pune Crime | बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरुन भावाने एका तरुणाला मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. अमित जीवन गायकवाड Amit Jeevan Gaikwad (वय 19, रा. हडपसर) असे अटक (Arrest) केलेल्या भावाचे नाव आहे.(Pune Crime)

 

याप्रकरणी श्रीकांत प्रदीप सूर्यवंशी Shrikant Pradeep Suryavanshi (वय 32, रा. टाकळी, कनगरा, जि. उस्मानाबाद) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. आम्रपाली नितीन जेटीथोर (Amrapali Nitin Jetithor) आणि नितीन जेटीथोर (Nitin Jetthor) यांच्यावरही गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हडपसरमधील गांधी चौक येथे शनिवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उस्मानाबाद (Osmanabad) येथे राहणारे असून ते शनिवारी पुण्यात आले होते. गांधी चौकातील (Gandhi Chowk) भाजी मंडई (Vegetable market) मध्ये ते शनिवारी रात्री आले होते. यावेळी तेथे अमित गायकवाड याने त्यांना पाहिले. आपल्या बहिणीला भेटायला आले आहेत, असा संशय त्याला आला. त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. आम्रपाली व नितीन यांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून त्यांना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण (Beating) केली. हा प्रकार पाहून त्यांची बहिण तेथे आली. तिलाही मारहाण करुन दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिंदे (Police Constable Shinde) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A young man was brutally beaten on the suspicion
that he had come to meet his sister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Must Read
Related News