Pune Crime | ऑफिसमधील महिलेशी ‘चॅट’ करण्यावरुन तरुणाचे अपहरण करुन मागितली 20 लाखांची खंडणी; तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऑफिसमधील महिलेशी चॅट करतो, या कारणावरुन भेटायला बोलावून तिघांनी तरुणाचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्याला कोपरगावला (Kopergaon) नेले. त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेऊन २० लाखांची खंडणी (Demand Of Extortion Money) मागितली. त्याने बाथरुमच्या बहाण्याने स्वत:ची सुटका करुन घेतली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

लहु विष्णु जाधव Lahu Vishnu Jadhav (वय २९, रा. अहमदनगर – Ahmednagar), महेश भाऊसाहेब कोटमे Mahesh Bhausaheb Kotme (वय २७, रा. नाशिक – Nashik) आणि मंगेश माणिक भाबड Mangesh Manik Bhabad (वय ३७, रा. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी वाकड (Wakad) येथे राहणार्‍या एका ३३ वर्षाच्या तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
फिर्याद (गु. रजि. नं. ४३२/२२) दिली आहे. हा प्रकार खराडी बासपास येथे १७ ऑगस्ट रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्या ऑफिसमध्ये काम करणारी महिला हिचे सोबत फिर्यादी चॅटिंग करीत होते.
त्यांना लहु जाधव याने फोन करुन तिचे सोबत चॅटिंग करु नको, असे सांगून खराडी येथे भेटायला बोलावले.
त्यानुसार फिर्यादी हे गेले असताना त्यांच्या चारचाकीमध्ये लहु व महेश हे बसले.
तुझे तिच्याबरोबरचे चॅट केलेले स्क्रीन शॉट आमच्याकडे आहे. लहु जाधव हा तिथला भाई आहे, असे सांगून मराठी मुलींचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असे सांगून लहू याने फिर्यादी त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेला.
तेव्हा त्यांच्याकडून फोन पे द्वारे १७ हजार रुपये घेतले. त्यांना मारहाण केली.
फिर्यादीची कारची चावी व क्रेडिट कार्ड वापरुन मॉलमध्ये खरेदी केली.
त्यानंतर त्यांना कोपरगाव येथे आणले.
तेथे त्यांना डांबून ठेवले असताना त्यांनी बाथरुमला जाण्याचा बहाणा केला.
त्यांची नजर चुकवून स्वत: ची सुटका करुन घेतले.
शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
पोलिसांनी तिघांना पकडून पुणे पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | A young man was kidnapped and demanded a ransom of 20 lakhs for chatting with a woman in the office Three arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा