Pune Crime | पती पत्नीच्या वादात समजाविण्याचा प्रयत्न करणार्‍या लहान भावावर कोयत्याने वार

पुणे : Pune Crime | सराईत गुन्हेगार (Criminal) व त्याची पत्नी यांच्यामध्ये घरात वाद चालू होता. त्यांच्या भांडणामध्ये पडण्याचा प्रयत्न लहान भावाला चांगलाच महागात पडला. सराईत गुन्हेगाराने घरातील कोयता काढून भावावर वार करुन जखमी केले. (Pune Crime)

रवी शाम वाघमारे Ravi Sham Waghmare (वय ३०, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अलंकार पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक (Arrest) केली आहे.

याप्रकरणी सचिन शाम वाघमारे Sachin Sham Waghmare (वय २१, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३७/२२) दिली आहे. हा प्रकार हॅपी कॉलनीतील घरात शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी शाम वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. तो साथीदारांसह घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करत असतो.
त्यामुळे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (Deputy Commissioner of Police Poornima Gaikwad)
यांनी त्याला गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये एक वर्षासाठी तडीपार केले होते. ही तडीपारी संपल्यानंतर तो घरी आला होता.

त्याचा पत्नीबरोबर वाद चालू होता. तेव्हा लहान भाऊ सचिन याने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यात त्यांच्या दोघांमध्ये वाद होऊ लागला. रागाच्या भरात रवी याने घरात लपवून ठेवलेला कोयता काढून
सचिनच्या हातावर मारुन त्याला जखमी केले. शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (Sub-Inspector of Police Chavan) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A younger brother who tries to mediate between a husband and wife is stabbed with a coyote

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा