×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तरूणावर टोळक्याकडून वार; कोथरुड परिसरातील...

Pune Crime | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तरूणावर टोळक्याकडून वार; कोथरुड परिसरातील घटना

पुणे : Pune Crime | पोलिसांना आमची माहिती देतो, पोलीस चौकीत (Police Chowk) तक्रार देत असल्याचा कारणावरुन गुंडांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)

याप्रकरणी निखिल राम शिंदे Nikhil Ram Shinde (वय २२, रा. मोरे श्रमिक वसाहत, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर येनपुरे ऊर्फ मांडी (Sagar Yenpure alias Mandi), साहिल जगताप (Sahil Jagtap), साहील कंदारे (Sahil Kandare), वैभव ऊर्फ बोर्‍या जगताप (Vaibhav alias Borya Jagtap), पिल्या खेडेकर (Pilya Khedekar) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. साहिल जगताप याला अटक (Arrest) केली आहे. हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Criminal) आहेत. हा प्रकार कोथरुडमधील मामासाहेब मोहोळ कॉलेजच्या गेटजवळ मंगळवारी पहाटे दीड वाजता घडला होता.

या टोळक्यानेच १ ऑक्टोबर रोजी अक्षय साठे या तरुणाला हनुमाननगरमधील भवानी माता प्रतिष्ठान मंडळासमोर मारहाण करुन त्यांच्याकडील महाप्रसादासाठीच्या वर्गणीसाठी आणलेले १० हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेले होते. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात दोघांना अटक केली आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत.
फिर्यादी व अमोल अवचिते (Amol Avachite) शेकोटी पेटवून गप्पा मारत बसले असताना सागर येनपुरे हा तेथे आला.
त्याने अमोल अवचिते यास सुरज पासुटे (Suraj Pasute) कोठे आहे, असे विचारुन कानाखाली मारली
व फिर्यादीला तू माझी माहिती पोलिसांना का देतो, तुला आता खल्लासच करतो,
असे म्हणून हातातील कोयता निखीलच्या उजव्या हाताच्या दोन बोटांवर मारुन गंभीर दुखापत केली.
त्यामुळे फिर्यादी घाबरुन पळून जाऊ लागला. तेव्हा साहील जगताप याने त्याला पकडले.
तु आमच्या विरोधात पंच बनतो काय असे म्हणून हाताने मारहाण केली.
फिर्यादी हे औषधोपचार करण्यासाठी अमोल अवचिते हा गाडीवरुन घेऊन जात असताना साहील जगताप,
वैभव जगताप, पिल्या खेडेकर यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.
दिगंबर हॉल येथे त्यांना अडवून पांग्या व मांडी हे आमचे भाई आहेत.
त्यांच्या विरोधात पोलीस चौकीला जातो काय ?, असे म्हणून त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
इतरांनी हातामध्ये कोयते फिरवून दहशत निर्माण करुन फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Crime | A youth was attacked by a gang on suspicion of being a police informer; Incidents in Kothrud crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन, दगडाने मारहाण; दोघांना अटक

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News