Advt.

Pune Crime | दुर्देवी ! काही दिवसातच होतं लग्न अन् काळाने केला मोठा घात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एक काळीज पिळवटुन टाकणारी घटना घडली आहे. पुणे (Pune Crime) येथून लग्नाची खरेदी करुन बहीण-भाऊ दुचाकीवरुन घरी परतताना दौंड (daund ) तालुक्यातील वरवंड येथे दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात बहीणीचा जागीच दुर्देवी मृत्यू (Died) झाला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने दुचाकीला पाठीमागुन येणा-या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला. ही घटना बुधवारी (19 जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. प्रतिक्षा सदाशिव कांबळे (Pratiksha Sadashiv Kamble) (वय 21, दोघेही रा. मलठण ता. दौंड जि. पुणे ) असं त्या मृत मुलीचं नाव आहे. तर, शुभम सदाशिव कांबळे (Shubham Sadashiv Kamble) असं जखमी भावाचे नाव आहे

याबाबत माहिती अशी, प्रतिक्षा कांबळे हीचा येत्या काही दिवसात विवाह होता. त्या निमित्त सकाळी ती आणि भाऊ शुभम बरोबर पुणे येथे कपडे आदी खरेदीला गेली होती. सायंकाळी पुणे सोलापूर महामार्गाने (Pune Solapur Highway) ते दुचाकीवरुन घरी परतताना सायकांळी साडे सहा वाजता वरवंड येथील कौठीचा मळा भागात त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन येणा-या अज्ञात वाहनाची धडक (Accident) बसली. या अपघातात दुचाकीसह बहीण-भाऊ रस्त्यावर पडले. वाहनाचे चाक अंगावरुन गेल्याने प्रतिक्षाचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ शुभम किरकोळ जखमी झाला आहे. (Pune Crime)

अपघातानंतर भररस्त्यात प्रतिक्षाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह, बाजुला लग्नाच्या खरेदीच्या कपडयांची पिशवी. भावाचा आक्रोश या दृशाने बघ्यांचे काळीज पिळवटुन गेले होते. दरम्यान, याबाबत माहिती समजताच पाटस टोलप्लाझाचे जनसंर्पक अधिकारी वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) यांनी रुग्णवाहीका घटनास्थळी पाठविली. पोलिस हवालदार घनशाम चव्हाण (Police Constable Ghansham Chavan), अजित इंगवले (Ajit Ingwale), समिर भालेराव (Samir Bhalerao), सुनिल बगाडे (Sunil Bagade) यांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवुन दिला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन पलायन झाले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title : Pune Crime | accident death in daund sister with brother pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे