
Pune Crime Accident News | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नर्हे परिसरात भूमकर पुलाजवळ खोबरे तेलाचा टँकर उलटला, वाहिले तेलाचे पाट (Video)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Accident News | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील (Mumbai-Bangalore Bypass Road) नर्हे भागातील भूमकर पुलाजवळ (Bhumkar Bridge Narhe Pune) सोमवारी दुपारच्या सुमारास खोबरे तेल वाहतूक करणारा टँकर अचानकपणे उलटला. टँकरमधून मोठया प्रमाणावर तेल बाहेर पडल्याने अक्षरशः खोबरे तेलाचे पाट वाहू लागले. दरग्यान, निसरडा झालेला रस्ता अग्नीशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी, वाहतूक पोलिसांनी आणि सिंहगड रोड पोलिसांनी टँकर बाजूला काढून पुर्ववत केला. (Pune Crime Accident News)
टँकर उलटला असला तरी यामध्ये जिवीत हानी झाली नाही. खोबरे तेलाचा टँकर उलटल्याने बाह्यवळण रस्त्यावर मोठया प्रमाणावर तेल पसरले होते. त्यामुळे रस्ता निसरला झाला. वाहतुकीचा वेग प्रचंड संथ झाला होता. सिंहगड रोड पोलिस (Sinhagad Road Police), भारती विद्यापीठ पोलिस (Bharti Vidyapeeth Police), वाहतूक पोलिस (Traffic Police) आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. काही वेळ वाहनांच्या रांगा बाह्यवळण रस्त्यावर पहावयास मिळाल्या. (Pune Crime Accident News)
तामिळनाडूमधील कोईमतूर येथून तब्बल 24 हजार लिटर खोबरे तेल घेऊन टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता.
नर्हे परिसरातील भूमकर पुलावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर अचानकपणे उलटला.
गिअर बॉक्स निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, अपघातात जिवित हानी झाली नाही. पाण्याचा मारा करून रस्ता स्वच्छ करण्यात आला.
त्यानंतर माती टाकून रस्त्यावरील वाहतूक सुरूळीत करण्यात आली.
Web Title :- Pune Crime Accident News | A coconut oil tanker overturned near Bhumkar bridge in Narhe area on the Mumbai-Bangalore bypass, the oil spilled (Video)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update