Pune Crime Accident News | शिरवळ येथील अपघातात पुण्याच्या चंदननगरमधील उद्योजकाचा मृत्यू

0
231
Pune Crime Accident News | An entrepreneur from Chandannagar, Pune, died in an accident at Shirwal
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Accident News | शिरवळ (ता. खंडाळा) Shirwal येथे झालेल्या भीषण अपघातात पुण्याच्या चंदननगरमधील उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना एका वॉशिंग सेंटरसमोर जीपची धडक बसल्याने घडली आहे. नंदकिशोर रावसाहेब आवारी (55, रा. चंदननगर, खराडी, पुणे – Chandan Nagar – Kharadi) असे मृत्यूमुखी पडलेल्या उद्योजकाचे नाव आहे. (Pune Crime Accident News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगरमधील उद्योजक नंदकिशोर आवारी हे सातारा जिल्हयातील भिलार (Bhilar Satara) येथे लग्न कार्याकरिता पुण्याहून दुचाकीवरून आले होते. लग्नानंतर आवारी हे पुन्हा पुण्याकडे जाण्यास निघाले. शिरवळ हद्दीत आले असताना पाऊस सुरू झाल्याने ते दुचाकी मार्गालगत थांबून सर्व्हिस रस्त्यावरून सुरक्षित ठिकाणी जात असताना रस्त्यावरून जाणार्‍या जीपने त्यांना जबर धडक दिली. जोरदार धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या आवारींना परिसरातील नागरिकांनी व जीप चालकाने शिरवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

 

Web Title :- Pune Crime Accident News | An entrepreneur from Chandannagar, Pune, died in an accident at Shirwal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त