Pune Crime Accident News | पुण्यातील NIBM Road जवळील इशरत बागमध्ये भीषण अपघात; एकजण जागेवरच ठार तर इतर तीघेजण गंभीर जखमी, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Accident News | कोंढवा पोलिस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील एनआयबीएम रोडजवळील (NIBM Raod) इशरत बागमधील (Ishrat Baug Kondhwa) चडावर बसचे ब्रेक फेल झाल्याने बस पाठीमागील 5-6 वाहनांना धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला (Fatal Accident In Pune) असून इतर तीघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे कोंढवा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. (Pune Crime Accident News)

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, एक खासगी बस कोंढव्यातील इशरत बाग परिसरातून जात होती. चडावरून बस जात असताना तिचे अचानक ब्रेक फेल झाली. बस पाठीमागे रिर्व्हस येत असताना तिने 5-6 वाहनांना उडवले. त्यामध्ये अ‍ॅटो रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. घटना एवढी गंभीर होती की कोणाला काही एक समजले नव्हते. झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime Accident News)

कोंढव्याच्या इशरत बाग परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खेळंबली होती. पुणे वाहतूक पोलिस आणि कोंढवा पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली. कोंढवा पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 

Web Title :  Pune Crime Accident News | Fatal accident at Ishrat Bagh near NIBM Road in Pune;
Two died on the spot and two others were seriously injured, Kondhwa police rushed to the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा