Pune Crime Accident News | दुर्देवी ! भरतीसाठी शिवाजीनगर पोलिस ग्राऊंडवर मुलीला सोडल्यानंतर झालेल्या अपघातात वडिल जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Accident News | पोलिस भरतीसाठी (Police Bharti In Pune) राज्यातील विविध ठिकाणावरून तरूण-तरूणी पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या (Shivajinagar Police Ground) ग्राऊंडवर येत आहेत. आज (सोमवार) पोलिस भरतीसाठी ग्राऊंडवर मुलीला सोडून चहा पिण्यासाठी रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Pune Crime Accident News)

सुरेश सखाराम गवळी (55, मुळ रा. नाशिक) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचे नाशिकचे रहिवाशी असलेले सुरेश गवळी हे रिक्षा चालक आहेत. पत्नी आणि 22 वर्षीय मुलीला घेवुन ते रविवारी रात्री 10 वाजता पुण्यात आले होते. पुण्यात कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या बाहेरील फुटपाथवर कुटुंबियांसह रात्री काढली. आज भरतीसाठी त्यांच्या मुलीचे ग्राऊंड होते. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला ग्राऊंडच्या गेटवर सोडले आणि ते पत्नीला सांगुन चहा पिण्यासाठी निघाले. तेथून काही अंतरावर चालत गेल्यानंतर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले.

पत्नी रेश्मा या काही अंतरावर असल्याने त्यांनी अपघात झाल्याचे पाहिले. परिसरातील लोकांनी घटनास्थळी
गर्दी केली. दरम्यान, गवळी हे रक्ताच्या थारोळयात पडले होते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title :- Pune Crime Accident News | Father died on the spot in an accident after leaving his daughter at Shivajinagar police ground for recruitment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू