Pune Crime Accident News | कोरेगाव भीमाजवळ भीषण अपघात, दोन तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे / कोरेगाव भीमा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Accident News | भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने दुसऱ्या दुचाकीवरील दोघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू (Accidental Death) झाला. हा अपघात (Pune Crime Accident News) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) जवळील वाडगाव येथील वाडगाव-डिंग्रजवाडी रोडवर (Wadgaon Dingrajwadi Road) सोमवारी (दि.5) सायंकाळी झाला. महादेव कांबळे व सिद्धेश शिंदे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार कंदारे याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडगाव – डिंग्रजवाडी रोडवर महादेव आणि सिद्धेश हे दुचाकीवरून (एमएच 12 जीपी 2036) जात होते. त्यावेळी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरुन भरधाव वेगात आला. त्याच्या दुचाकीची धडक महादेव आणि सिद्धेश यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन महादेव याचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धेश याला उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटल (Sasoon Hospital) येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Pune Crime Accident News)
अपघातात ओंकार कंदारे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याबाबत महादेव कांबळे याचे चुलते अमोल कांबळे (वय-33 रा. कोरेगाव भीमा, पंढरीनाथ नगर) यांनी
शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (PI Pramod Kshirsagar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने (Police Havaldar Rajesh Mane) हे तपास करत आहेत.
Web Title : Pune Crime Accident News | Pune Koregaon Bhima : two boys died in road accident
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा