Advt.

Pune Crime | अपघात की घातपात ! पुण्यात पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंढवा परिसरातील केशवनगर (Keshavnagar, Mundhwa) येथील कुंभारवाडा (Kumbharwada) येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून मुंढवा पोलिस ठाण्यातील (Mundhwa Police Station) पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी (Pune Crime) धाव घेतली आहे.

 

शरद भुजबळ (47, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा, पुणे) आणि हेमा (43 – ही नेपाळी महिला आहे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शरद भुजबळ हा एनआयबीएम रोडवरील एका ट्रव्हल्समध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. शरद याच्याशी संपर्क होत नसल्याने त्याचा मित्र परवेज आलमने त्याचे घर गाठले. परवेज शरदच्या घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, घरातील गॅस चालू होता पण सिलेंडर संपलेले होते. घराच्या शेजारी केमिकलचे कॅन्ड आढळून आले आहेत. शरद आणि हेमा यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं देखील पोलिसांना दिसलं आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आले आहे.

 

मुंढवा परिसरातील घरात पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद आणि हेमा यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना म्हणजे अपघात की घातपात (Accident Or Murder) याचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, शरद आणि हेमा यांनी आत्महत्या (Suicide) केली असे देखील सद्यपरिस्थिती पाहून म्हणता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुंढवा पोलिसांनी घटनेची नोंद करून (Pune Crime) तपासास सुरूवात केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Accident or murder or may be suicide ! The bodies of a man and a woman were found in mundhwa keshavnagar area of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा