Pune Crime | दुर्दैवी ! पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात डंपरचे चाक अंगावरुन गेल्याने महिला प्राध्यापिकेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॉलेजमध्ये निघालेल्या महिला प्राध्यापिकेच्या (Women Professors) अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. वृषाली तुषार थिटे Vrishali Tushar Thete (वय – 38 रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिला प्राध्यापिकेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हे येथील झील कॉलेजमध्ये (Zeal College Narhe) प्राध्यापक होत्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन कॉलेजमध्ये जात होत्या. वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk) येथील कॅनॉल लगतच्या शिंदे मैदानाजवळ आले असताना भरधाव वेगात आलेल्या डंपरची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये थिटे या खाली पडल्या. त्यांच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Crime)

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव (API Rahul Yadav), पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड (PSI Asmita Lad),
वाहतूक विभागाचे (Traffic Department) सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे (API Prashant Kanse)
व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वृषाली थिटे यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातानंतर चालक डंपर सोडून पळून गेला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title : – Pune Crime | accidental death of female professor incident in sinhgad road area pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा