Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत ‘कर्मयोगी’च्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू, विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फुटल्याने तो बदलत असताना मागून येणाऱ्या खासगी बस चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात (Accident) दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील (Indapur) गागरगाव हद्दीत गुरुवारी (दि.18) रात्री साडेअकरा वाजता झाला.

 

पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते Aditya Devkate (वय-18) याचा मृत्यू झाला. तर विश्वास रंगनाथ देवकाते (वय-45) आणि संतोष अंकुश पवार Santosh Ankush Pawar (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) हे जखमी झाले आहे. आदित्य देवकाते हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक (karmayogi factory director) विश्वास देवकाते (Vishwas Devkate) यांचा मुलगा होता.

 

गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 42 क्यू 4122) पुणे बाजूकडून सोलापूरच्या (Solapur) दिशेने जात होता. त्यावेळी पुढील ट्रॉलीचा टायर फुटला. हा टायर बदलत असताना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बस (एमएन 01 बी 1440) वरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने बसची ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक (private bus collision) बसली.

या अपघातात विश्वास देवकाते आणि संतोष पवार हे तिघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्राचे (police help center) सहायक फौजदार भागवत शिंदे (API Bhagwat Shinde),
पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचार सुरु असताना आदित्य देवकाते याचा मृत्यू (Pune Crime) झाला.

 

Web Title :- Pune Crime | accidental death of karmayogi factory director vishwas devkate son aditya in private bus collision on pune solapur highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या 17 वर्षीय मुलीचं बंद खोलीत धक्कादायक कृत्य

Vikram Gokhale | ‘त्या’वरून विक्रम गोखले संतापले; म्हणाले – ‘त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?’

Vikram Gokhale | ‘2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत मी बदलणार नाही’ – विक्रम गोखले

Hanuma Vihari | भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारीच्या ‘त्या’ ट्विटने क्रिकेट जगतात खळबळ !

Nanded Crime | जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण ! नायब तहसीलदारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime | गाई चरण्यावरुन वनरक्षकाला बेदम मारहाण, 7 ते 8 जणांवर FIR