Pune Crime | पुण्यात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात (Pune Crime) आरोपीला विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे (special judge S. P. Ponkshe) यांनी जामीन मंजूर (bail granted ) केला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मुलीला राहत्या घरातून पळवून नेले होते. आरोपीने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन पळवून नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police) दिली होती. त्यानुसार सुरुवातीला भा.द.वि. कलम 363 नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला. Pune Crime | Accuse of rape case get bail in pune

या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी आरोपीला 31 मे 2021 रोजी अटक केली. त्याच्यावर भा.द.वि कलम 366 (अ),376 (2) (एन) व पोक्सो कलम 4, 8,12 नुसार कलम वाढ केली. या गुन्ह्यामध्ये आरोपीची 25 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आरोपी महंमद मुबारक शेख (Mohammed Mubarak Sheikh) याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

आरोपीतर्फे अ‍ॅड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi) यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. मजहर मुजावर (Adv. Mazhar Mujawar), अ‍ॅड.अजिंक्य खैरे (Adv. Ajinkya Khaire) यांनी जामीन अर्ज दाखल केला.
सुरुवातीला पीडिताच्या आईने कलम 363 नुसार जानेवारी महिन्यात अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीला मे महिन्यात अटक करण्यात आली.
दि.10 जून 2021 रोजी पीडिताने मुलाला जन्म दिला असून आरोपी व पीडित या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत.
तसेच दि.23 जानेवारी 2021 पासून दोघेही एकत्र राहत असून पीडिताने स्वतःच्या वैद्यकीय तपास करण्यास नकार दिला आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला.

Web Title : Pune Crime | Accuse of rape case get bail in pune

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल