×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यात 6 महिने फरार असलेला आरोपी अटकेत

Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यात 6 महिने फरार असलेला आरोपी अटकेत

पुणे : Pune Crime | अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात भारती विद्यापीठ (bharti vidyapeeth police) पोलिसांना (Pune Crime) यश आले आहे.

प्रशांत प्रकाश गायकवाड Prashant Prakash Gaikwad (वय २०, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. प्रशांत गायकवाड याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा झाला होता. त्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकामधील पोलीस अंमलदार शिवदत्ता गायकवाड (Shivdatta Gaikwad) यांना प्रशांत हा कात्रज भाजी मंडई येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे (PSI Ankush Kachre) यांना ही माहिती कळविली. त्यानंतर तपास पथकाने कात्रज भाजी मंडई येथे जाऊन सोनल वाईन्ससमोर थांबलेल्या प्रशांत गायकवाड याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे (PSI Avinash Dhame) अधिक तपास करीत आहेत.

 

हे देखील वाचा

Gold-Silver Price Today | सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Corona In India | भितीदायक ! गेल्या 24 तासात देशात कोरोनाची 46,164 नवी प्रकरणे; 607 जणांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Title : Pune Crime | Accused absconding for 6 months for rape is arrested by bharti vidyapeeth police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Must Read
Related News