Advt.

Pune Crime | बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग करुन तिला भेटण्यास बोलावून घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन (Abuse) केल्याचा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Road Police Station) हद्दीत घडला होता. याप्रकरणातील आरोपीवर बाललैंगिक कायद्याप्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली (Pune Crime) होती. या गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश किसन मोहिते (Rishikesh Kisan Mohite) याची विशेष कोर्टाचे न्यायाधीश के.के. जहागीरदार (Special Court Judge K.K. Jahagirdar) यांनी निर्दोष (Innocent) मुक्तता केली आहे.

 

आरोपी ऋषिकेश मोहिते याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात 25 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र (Charge Sheet) न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून तीन साक्षीदार तपासण्यात आले होते. तर आरोपीच्या वतीने दोन साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश के.के. जाहागीरदार यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.(Pune Crime)

 

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. तनवीर जहागीरदार (Adv. Tanveer Jahagirdar) यांनी कामकाज पाहिले. तर अ‍ॅड. रईसा खान (Adv. Raisa Khan), अ‍ॅड. इमरान शेख (Adv. Imran Sheikh) व अ‍ॅड. मिथुन चव्हाण (Adv. Mithun Chavan) यांनी मदत केली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. ब्रम्हे यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title :- Pune Crime | Accused acquitted of the crime of child sexual abuse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा धक्का ! न्यायालयाने अखेर जामीन अर्ज फेटाळला

 

Ileana D’cruz Oops Moment | इलियाना डीक्रूजने परिधान केला ‘इतका’ ट्रान्सपरंट ड्रेस अभिनेत्री झाली Oops Moment ची शिकार

 

Maharashtra Rains | राज्यात गारपिटीचं सावट ! विकेंडला पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार