Pune Crime | ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है ! फरार आरोपीला 41 वर्षानंतर ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है, कानुन के हाथ से कोई मुजरीम नही छूट सकता’ अशी हिंदीत म्हण आहे. कायद्याचे हात किती लांब असू शकतात याचा प्रत्यय पुण्यात (Pune Crime) नुकताच एका घटनेत आला आहे. 1980 साली जबरी दरोडा (Robbery) टाकून रोकड आणि दागिने घेऊन (robbed money and ornaments) पळालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला तब्बल 41 वर्षानंतर अटक (Arrest) केली आहे. आरोपी मागील अनेक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी अत्यंत शिताफिने सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अंकुश माणीक गायकवाड Ankush Manik Gaikwad (वय-58 रा. खडकी, ता करमाळा जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गायकवाडने आपल्या अन्य 8 साथीदारांच्या मदतीने दौंडजवळील यवत (Yavat) येथे जबरी दरोडा टाकला होता. हा गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण यातील सहा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु आरोपी गायकवाड याच्यासह तिघेजण मागील 41 वर्षापासून फरार होते.

दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी नुकतेच जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलिसांनी जुन्या रेकॉर्डवरील फरार आरोपींचा (Fugitive accused) शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गायकवाड हा करमाळा खडकी रोडवर (Karmala Khadki Road) जनावरं चारायला गेला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि आरोपी अंकुश गायकवाड याला अटक केली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,
आरोपीने 1980 साली यवत याठिकाणी दरोडा टाकल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Titel :- pune crime | accused arrest after 41 years pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा

Pune Crime | इंदापूरमध्ये दुचाकीस्वारानं रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्याच्या नादात 2 लाख गमावले

Pune Crime | राजगुरुनगरच्या खरपुडी गावचे सरपंच विशाल काशिद यांना जीवे मारण्याचा प्रयत्न