Pune Crime | गारवा बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार करुन फरार झालेले आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime |बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी आपल्या साथिदारांना बोलवून घेत गारवा बिर्याणी हॉटेल (Garva Biryani Hotel) मालक आणि कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न (Attempt murder) केल्याची घटना शनिवारी (दि. 21) रोजी चारच्या सुमारास पुण्यात घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक (Anti extortion cell) एकच्या पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे.

ओमकार संतोष सातपुते (वय-18 रा. धायरी गारमळा, गणपती ज्वेलर्सच्या मागे, धायरी),
तेजस गणेश निवंगुणे (वय- 20 रा. श्रीराम संकुल, ए विंग, मुरली हॉटेल मागे, धायरी गाव),
अनिकेत विनायक जाधव (वय-21 रा. धायरी गारमळा, रायबा हॉटेल शेजारी, धायरी गाव)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल असून घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
खंडणी विरोधी पथक एकच्या पोलिसांनी आरोपींना बुधवारी (दि.) पुरंदर तालुक्यातील (Purandar taluka) डोंगर परिसरातून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये आरोपी ओमकार सातपुते व संकेत मिरगल हे गेले होते.
त्यावेळी त्यांचे हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ भांडण झाले.
याचा राग मनात धरुन आरोपींनी अनिकेत जाधव, वैष्णव उर्फ बापु झांबरे, महेश संजय उबाळे,
ओंकार सातपुते व संकेत मिरकल (सर्व रा. धायरी) यांनी हॉटेलमध्ये येऊन हॉटेल मालक आणि
कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. तसेच हॉटेलची तोडफोड केली होती.

बुधवारी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी पोलीस अमंलदार रमेश चौधर (Ramesh Chaudhar) व गजानन सोनवलकर (Gajanan Sonwalkar) यांना आरोपी पुरंदर तालुक्यातील महादेव मंदिर, डोंगर परिसरात ओळख लपवून बसले असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून डोंगर परिसरातून अटक केली.

 

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner Dr Ravindra Shisve),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुरेंद्रनाथ देशमुख (ACP Surendranath Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Inspector of Police Mahendra Jagtap), सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अमंलदार पांडुरंग वांजळे, अतुल साठे, नितीन कांबळे,
रमेश चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमर पवार, विजय कांबळे हनुमंत कांदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Accused escaped after attacking Garwa Biryani hotel owner with a scythe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Government | ठाकरे सरकारकडून राज्यातील लाखो अधिकार्‍यांना मोठा दिलासा ! मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 6 महत्वपूर्ण निर्णय

JEE Main-NEET 2021 | नीट आणि जेईई मेनच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, यावेळी नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल, जाणून घ्या

Indian Railways-IRCTC | रेल्वे प्रवाशांच्या या समस्यांचे निराकरण करते ‘रेल्वे हेल्पलाईन 139’, पहा यादी