Pune Crime | पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन, खराडी मुंढवा बायपास रोडवरील घटना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad) अटक (arrest) केलेल्या आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पलायन (accused escaped) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही पुण्यातील (Pune Crime) खराडी-मुंढवा बायपास रोडवरील (Kharadi-Mundhwa bypass road) साईनाथ नगरमध्ये शुक्रवारी (दि.20) सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली आहे. आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबेर हाफिज शेख (वय-20 रा. मरकुंडा, ता.जि. बिदर, कर्नाटक) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राचकोंडा जिल्ह्यातील (Rachkonda district) सरूरनगर पोलीस स्टेशनचे
(Sarurnagar Police Station) पोलीस उपनिरीक्षक बी कृष्णय्या रामलु बी (PSI B. Krishnayya Ramalu b) (वय-55) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station)
फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर शेख (Zubair Sheikh) याच्यावर सरुरनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक बी कृष्णय्या रामलु बी व पोलीस कॉन्स्टेबल बालाराज आणि पी. सुरेश हे पुण्यात आले होते.
हैदराबाद पोलिसांनी आरोपीला अटक करुन खासगी वाहनातून घेऊन जात होते.

 

आरोपी गाडीच्या मागच्या सीटवर बसला होता. खराडी-मुंढवा बायपास रोडवरील हॉटेल पंचम समोर आरोपी हा कारच्या उघड्या दरवाजाजवळ बहीण शबनम उर्फ पुनम सुरेश गालफाडे हिच्यासोबत बोलत होता. पोलिसांची नजर चुकवून त्याने गाडीतून पळून गेला.
पोलिसांनी आरोपीचा नदीपात्र व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र तो सापडला नाही.
हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी जुबेर शेख याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल थोपटे (Police Inspector (Crime) Sunil Thopte) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Accused escapes from police custody, incident on Kharadi Mundhwa bypass road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raosaheb Danve | ‘गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर गावच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो’

Afghanistan Crisis | काबूल एअरपोर्टहून तालिबान्यांनी केलं 150 लोकांचे अपहरण; बऱ्याच भारतीय नागरिकांचा समावेश

Pune Crime | पप्पु येनपूरे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची मोक्का कारवाई, आतापर्यंत 49 टोळ्यांवर कारवाई