Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर उर्फ लालबादशाह खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काँग्रेसचा कार्यकर्ता (Congress Activist) आणि बांधकाम व्यावसायिक (Builder) समीर हुसेन मनूर याचा खून (Murder) केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) सोमवारी रात्री उशिरा तिघांना अटक (Arrest) केली. आर्थिक वादातून (financial disputes) समीर उर्फ लालबादशाह हुसेन मनूर  Sameer alias Lalbadshah Hussain Manoor (वय-32 रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रुक) याचा खून (Pune Crime) केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आज (मंगळवार) आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी (police custody) सुनावली.

 

मेहबुब सैफान बलुरंगी (वय-33 रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय-30 रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय-19 रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात (Pune Crime) घेतले आहे. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयाने 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मेहबुब बलुरंगी आणि निलेश कुंभार यांच्यावतीने अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) आणि अ‍ॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev) यांनी बाजू मांडली. (Pune Crime)

काय आहे प्रकरण?
समीर हा पूर्वी जनता वसाहत (Janta Vasahat Pune) येथे राहात होता. मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत कारावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करत होता. या आर्थिक व्यवहारातून मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट (Conspiracy of Murder) रचला.

 

सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास समीर बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता.
तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या.
डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

Web Title :- Pune Crime | Accused in Pune Congress worker and builder Sameer alias Lalbadshah murder case remanded in police custody

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | ‘या’ योजनेतून सुमारे 40 लाख लोकांना मिळाली नोकरी! मोदी सरकारनं संसदेत सांगितलं

New Feature in Gmail | Gmail मध्ये आले ‘हे’ शानदार फीचर, आता यूजर्स चॅटसोबत करू शकतात Audio आणि Video कॉल

Omicron Symptoms in kids | जास्त ताप-सतत खोकला, मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची ही 6 विशेष लक्षणं; जाणून घ्या