Pune Crime | 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीची येरवडा जेलमध्ये रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | पुणे शहरासह इतर ठिकाणी दाखल असलेल्या 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या अ‍ॅड. सागर मारूती उर्फ राजाभाऊ सुर्यवंशी (advocate sagar suryavanshi) याची येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी करण्यात (Pune Crime) आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला पुणे सीआयडीने (CID) शुक्रवार पेठेतून अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सीआयडीच्या पथकाने त्याचे ‘व्हॉईस सॅम्पल’ घेतले आहेत.

सीआयडीने ॲड. सूर्यवंशी (advocate sagar suryavanshi) याला मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री अटक केली होती.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले होते.
तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर, त्याला सीआयडीच्या पथकाने न्यायालयात हजर केले.
न्यायालयात सुर्यवंशीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज (Bail Application) दाखल केला होता.
मात्र, हा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (Pimpri Chinchwad EoW) तसेच हिंजवडी पोलिसांकडून (hinjewadi police station)
सुर्यवंशीचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
पुणे पोलिसांनी मात्र न्यायालयात सुर्यवंशीचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केला नाही.
पिंपरी चिंचवडचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबर म्हणाले, आम्ही न्यायालयात अर्ज केला होता.
मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर करीत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

 

अ‍ॅड. सागर सुर्यवंशी याच्यावर पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात, लष्कर, तसेच पिंपरी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी आणि नवघर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
जमिनीच्या संदर्भात फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हयांचा त्यामध्ये समावेश आहे.
पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाकडून त्याला फरारी घोषित करण्यात आले होते.
तसेच उच्च न्यायालयाने गेल्या 3 वर्षापासून फरार असलेला अ‍ॅड. सुर्यवंशीला का अटक (Pune Crime) होत नाही अशी विचारणा देखील सीआयडीकडे केली होती.

सूर्यवंशीचा सेवा विकास बँकेच्या 50 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात समावेश असल्याचे पोलिसानी सांगितले.
त्याचा कोरेगाव पार्क येथील बंगला बँकेने जप्त केला असून लवकरच पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा लिलाव केला जाणार असल्याचे पोलिसानी (Pune Crime) सांगितले.

 

Web Title : Pune Crime | Accused of 11 serious offenses advocate Sagar Suryavanshi sent to Yerawada Jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune RTO | पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार, RTO कडून रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी; जाणून घ्या किती रुपये वाढणार

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून घ्या नवीन दर

LIC Aam Aadmi | ‘एलआयसी’चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा; जाणून घ्या