Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना 24 तासाच्या आत तावरे कॉलनी परिसरातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील हत्येच्या प्रयत्नातील आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा केल्यानंतर आरोपी तावरे कॉलनी परिसरात लपून बसले होते. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या (Arrested) आहेत. ही कारवाई सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police) केली आहे. कलावती शिवाजी कांबळे, (वय, 50, रा. तळजाई वसाहत) यांनी 23 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती.

याबाबत माहिती अशी, जखमी आतिश शिवाजी कांबळे (Atish Shivaji Kamble) (वय, 27 रा. तळजाई वसाहत) हा धनकवडी येथे गॅरेजवर काम करत असताना त्याला दोघा तिघांनी मिळून धारदार हत्याराने मानेवर आणि हातावर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. साहिल बळीराम पाटोळे (Sahil Baliram Patole) (वय, 20 रा. तळजाई वसाहत) आणि त्याचे साथीदार संकेत चव्हाण (Sanket Chavan) व अमोल पवार (Amol Pawar) (दोघे रा. तळजाई वसाहत) यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता.

संबधित आरोपी तावरे कॉलनी येथे लपुन बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीवरुन आरोपींना तावरे कॉलनी येथे पोलिस पथकानी सापळा रचुन अटक केली आहे.
त्याच्याजवळील गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
या दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पीआय स्वाती देसाई (Sr PI Swati Desai), पीआय युनुस मुलानी (PI Yunus Mulani) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पीएसआय सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, सागर सुतकर व शिवलाल शिंदे यांनी केली.

Web Titel :- Pune Crime | Accused of attempted murder arrested from Taware Colony area within 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Divya Gunde | जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे UPSC परीक्षेत उत्तीर्ण

Sinhagad Road Flyover | पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन (व्हिडिओ)

Pune Crime | राष्ट्रवादी नगरसेवकाच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार