Pune Crime | महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपये दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | महिलेच्या खुन प्रकरणातील (Murder Case) आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप (life imprisonment) आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. चंद्रदेव उर्फ चंदन उमेद कामथी Chandradev alias Chandan Umed Kamathi (वय-34 वर्ष, रा. नेपन्सी रोड, मुंबई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव (District and Sessions Judge P.P. Jadhav) यांनी भादवि कलम 302, 201 अन्वये दोषी धरून कलम 302 अन्वये पाच लाख रूपये दंड व जन्मठेप कलम 201 अन्वये मयताचा मृतदेह फरफटत ओढत गार्डन मध्ये नेवुन पुरावा नष्ट करणेच्या उद्देशाना लपवुन ठेवल्याने पाच हजार रूपये दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा (Pune Crime) सुनावली.

 

आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी सरकारी वकिल विलास घोगरे पाटील (Government Advocate Vilas Ghogre Patil) यांनी 12 साक्षीदार तपासले.
त्याकामी त्याना लोणावळा पोलीस स्टेशनचे (Lonavla Police Station) पोलीस कॉनस्टेबल संतोष सोनावणे (Police Constable Santosh Sonawane) यांनी मदत केली.
आरोपींविरुद्ध लोणावळ शहर पोलीस स्टेशनचे (Lonavla city police station) तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव (Police Inspector Chandrakant Jadhav) दोषारोपपत्र दाखल केले होते.

 

काय आहे प्रकरण ?

 

ही घटना बंगला नं. 67 हिलटॉप कॉलनी खंडाळा येथे घङली होती. घटनेच्या वेळेस मयत रंजना मकर यांचे पती फिर्यादी जगन्नाथ मकर हे नातेवाईकाच्या लग्नास पुण्यात (Pune) आलेले होते.
साक्षीदार सुमन देवकर यांच्या साक्षीप्रमाणे आरोपी बंगल्याच्या दिशेने गेला होता. आरोपी हा मुंबईचा राहाणारा होता.
परंतु मोबाइल लोकेशन (Mobile location) प्रमाणे आरोपी हा घटनास्थळावर हजर होता.
मयताशी झालेल्या झटापटी मध्ये आरोपीच्या कोपराजवळ मार लागल्याच्या ताज्या खुणा आढळून आल्या होत्या व मयताचे रक्त आरोपीच्या कपङ्यावर मिळुन आले होते.
हा परिस्थितीजन्य पुरावा पाहाता आरोपीनेच गुन्हा केल्याचे सिद्ध होते.
असा युक्तिवाद सरकारी वकिल विलास घोगरे पाटील (Government Advocate Vilas Ghogre Patil) यांनी न्यायालयात केला.
तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस वरिल प्रमाणे शिक्षा (Pune Crime) सुनावली.

 

पाच लाख दंङाच्या रकमेपैकी चार लाख रूपये रक्कम ही आरोपीने मयत रंजना हिचे पती जगन्नाथ मकर ह्याना नुकसान भरपाई म्हणुन देण्यात यावेत.
असे जिल्हा वसञ न्यायाधीश पी. पी. जाधव साहेब यांनी निकालपञात नमुद केले आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत आरोपीस कमीतकमी पाच लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे परंतु,
आरोपीस भारतीय दंड सहिंता अन्वये पाच लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा देवुन,
ती रक्कम मयताच्या पतीस देण्यात यावीत असे आदेश हे दुर्मिळातील दुर्मिळ असुन त्यामुळे गुन्हेगारावर वचक बसेल.
असे सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Crime | Accused of killing woman fined Rs 5 lakh pune court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,781 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर ‘अब तक 56’ ! ‘या’ कारणामुळं ‘सेल्फी पॉईंट’जवळ अपघात होत असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्टचं सांगितलं (व्हिडीओ)

Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा