Pune Crime | पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गंभीर गुन्ह्यातील आरोपीने ससून रुग्णालयातून (Sasoon hospital) पलायन (criminal escape) केले आहे. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ (Pune Crime) उडाली असून आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. हा प्रकार आज (मंगळवार) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.

किशोर आत्माराम शिरसाठ (वय- 30 रा. येरवडा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. किशोर शिरसाठ याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक (Pune Crime) केली होती. तो आज ससून रूग्णालयात असताना त्याने पोलिसांची (Pune Police) नजर चुकवून तो रुग्णालयातून पळून गेला. आरोपी पळून गेल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयातून आरोपीने पलायन केल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि इतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्याला (bund garden police station) ससून रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात नोंद (Pune Crime) करण्यात आली आहे.

Web Title :  Accused of serious crime escapes from Sassoon Hospital in Pune bundgardan police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR