Pune Crime | तडीपार असताना खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

0
312
Pune Crime Accused who absconded after attempting murder was arrested by the Pune Police Crime Branch
File photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | टपरी टाकण्यास परवानगी दिली नसल्याचा राग मनात धरून प्रथमेश उर्फ गोट्या सुर्यवंशी (Prathamesh alias Gotya Suryavanshi) याने तडीपार (Tadipar) असताना त्याच्या साथिदारांच्या मदतीने केतन प्रदिप गावडे Ketan Pradip Gawde (वय – 29 रा. येरवडा गावठाण) याच्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला होता. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट चारच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. हा प्रकार 10 एप्रिल रोजी येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीत (Pune Crime) घडला होता. आरोपी विरुद्ध IPC 307, 504, 506, 427, 34, मपोका 142, 37 (1) (3) सह आर्म अ‍ॅक्ट Arm Act 4 (25) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी (दि.18) येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तडीपार आरोपी प्रथमेश उर्फ गोट्या राजेंद्र सुर्यवंशी (रा. येरवडा) हा पर्णकुटी पायथा, हिरामन गवळीवाडा (Hiraman Gawliwada) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला झडप घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार कोयता जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय महाजन (Police Inspector Abhay Mahajan), महिला सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर (API Shobha Kshirsagar), पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaydeep Patil), पोलीस हवालदार नागेशसिंग कुंवर, कौस्तुभ जाधव, स्वप्निल कांबळे यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Accused who absconded after attempting murder was arrested by the Pune Police Crime Branch


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा