Pune Crime | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपींची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उत्पन्ना पेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता (Unaccounted Assets) संपादित केल्याप्रकरणी पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील (PMC Water Supply Department) मुकादम व त्याच्या पत्नीवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) खटला दाखल केला होता. या खटल्यात मुकादम शंकर सिताराम महापुरे (Shankar Sitaram Mahapure) व त्यांची पत्नी लता शंकर महापुरे (Lata Shankar Mahapure) यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव (Special Judge P. P. Jadhav) यांनी निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे. हा (Pune Crime) खटला 8 वर्षे चालला.

 

पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील मुकादम शंकर महापुरे यांनी 1987 ते 2009 या कालावधीत उत्पन्ना पेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्या प्रकरणी पुणे एसीबीने (Pune ACB) खटला दाखल (Pune Crime) केला होता. या खटल्यात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi), अ‍ॅड. प्रमोद धुळे (Adv. Pramod Dhule), अ‍ॅड. महेश राजगुरु (Adv. Mahesh Rajguru) यांनी कामकाज पाहिले.

या प्रकरणाची चौकशी 2007 पासून सुरु होती. त्यानंतर 2013 मध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करुन या प्रकरणाची सुनावणी 8 वर्षे चालली. यामध्ये न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दाखल केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीकडे सदर कालावधीत त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आली नाही. तसेच आरोपींकडे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न हे लाचलुचपत विभागाने ग्राह्य धरले नव्हते. ते आरोपींच्या वकीलांच्या युक्तीवादावर ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

 

 

Web Title : – Pune Crime | Acquittal of accused in undeclared assets case after 8 years

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा