Pune Crime | सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळेवर MPDA अंतर्गत कारवाई, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 44 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळे (Prithviraj Kamble) याच्यावर पुणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबद्धेचे आदेश दिले आहेत. मागील एक वर्षात पोलीस आयुक्तांनी एमपीडीए (MPDA) अंतर्गत केलेली ही 44 वी कारवाई (Pune Crime)आहे.

पृथ्वीराज कांबळे (वय-29 रा. मंगळवार पेठ, पुणे) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्टा, कोयता, लोखंडी सळई, सुरा, लाकडी दांडके या सारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted murder), गंभीर दुखापत, दुखापत, दरोड्याचा प्रयत्न, दंगा, सरकारी नोकरावर हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून तक्रारीसाठी (Pune Crime) कोणी पुढे येत नव्हते.

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (senior police inspector rajendra landge) यांनी सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळे याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचा प्रस्तावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाची पडताळणी करुन कांबळे याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षाकरीता स्थानबद्ध (Pune Crime) करण्याचे आदेश जारी केले.

 

वर्षभरात 44 जण स्थानबद्ध

गेल्या वर्षभरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 44 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्ये स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए अंतर्गत कारवाई (Pune Crime) केली जाणार आहे.

 

Web Title :- Pune Crime | Action against MP Prithviraj Kamble under MPDA, 44th action of Police Commissioner Amitabh Gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर, दिले ‘हे’ स्पष्ट आदेश

Pune Corona | दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही; 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Benefits of Pani Puri | पाणीपुरी खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे ! आठवड्यात दोनवेळा खाल्ल्याने मुळापासून नष्ट होतील ‘हे’ आजार

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?