Pune Crime | व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर खंडणीविरोधी पथक दोनकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर दंड म्हणून पुन्हा पैशांची मागणी करत शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकाराविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक दोनने गुन्हा दाखल केला आहे. योगेश पंडित भालेराव (वय – 27, रा. गोकुळनगर, बाजारपेठ लोहगाव रोड, धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे.

 

याबाबत प्रकाश राजेंद्र सरोदे (वय – 27, रा. कोंढवा) यांनी खंडणीविरोधी पथक दोनकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाचा तपास करून खंडणीविरोधी पथकाने भालेराव याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 384, 385 व महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी राजेंद्र सरोदे यांनी खासगी सावकार योगेश भालेराव याच्याकडून एप्रिल 2021 मध्ये दोन लाख व फेब्रुवारी 2022 मध्ये दोन लाख असे एकूण चार लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. फिर्यादी यांनी मुद्दल आणि व्याज असे एकूण 4 लाख 80 हजार रुपये भालेराव याला दिले होते. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी आरोपीने फिर्यादी यांनी फोन करून टेम्पो ताब्यात घेण्याची धमकी देऊन दंड म्हणून आणखी 4 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. सरोदे यांनी खंडणीविरोधी पथक दोनकडे याबाबत तक्रार अर्ज केला. अर्जाची चौकशी केली असता आरोपीने पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी भालेराव याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगांवकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे,
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे,
विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाणे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे,
चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, रवी सपकाळ, महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रूपाली कर्णवर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Action by anti-extortion cell two against lenders who extort money with interest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर