Pune Crime | अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांची (Pune ZP Education Officer) बनावट स्वाक्षरीची (Bogus Signature) स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने (Jog Education Trust) शिक्षण विभागाची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). संस्थेच्या ११ शाळांचे मुख्याध्यापकांद्वारे २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे शुल्क मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे (Fake Document) तयार करुन ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना सादर केली होती (Cheating Case). ही प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी पावणेतीन लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सुप्रसिध्द अभिनेता पुष्कर जोग यांच्या आई सुरेखा जोग यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cheating Case Registered Against Pushkar Jog Mother As Well As Jog Education Trust president Surekha Suhas Jog In Pune)

 

याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किसन दत्तोबा भुजबळ (वय ५३) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. १२२/२२) दिली आहे. त्यानुसार जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग (Surekha Suhas Jog), वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेडगे (Gautam Shankar Shedge), सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी किशन पवार (Kishan Pawar) आणि मनरेगा विभागाचे (Manrega) वरिष्ठ सहायक हेमंत सावळकर (Hemant Savalkar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१९ ते २४ मे २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार आली होती. त्याची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी किशोर पवार, हेमंत सावळकर यांनी एज्युकेशन ट्रस्ट कडून एका स्वमान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपये याप्रमाणे अकरा सर्व मान्यता प्रमाणपत्रासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे पोलिसांनी (Pune Police) केलेल्या तपासणीत दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये घुसून सावळकर यांनी कोणाचीही परवानगी न घेता जावक रजिस्टर मधील नोंदणी चे फोटो काढून शाळेचे कर्मचारी महेश कुलकर्णी यांना पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे आरटीई शुल्क प्रतिपूर्ती ची रक्कम मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्याचे समोर आले आहे. Pune Police Economic offences wing (Pune EoW) आर्थिक गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलीस निरीक्षक सुनिल खेडेकर (Police Inspector Sunil Khedekar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Actor Pushkar Jog’s mother Surekha Suhas Jog charged
with fraud in Pune, find out the case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त