Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

पुणे : Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटचे (Serum Institute) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या नावाने बनावट व्हॉटसअ‍ॅप (Fake WhatsApp) मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक (Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी सिरम इन्स्टिट्युटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तुर Finance Officer Sagar Kittur (वय ४४, रा. कोंढवा – Kondhwa) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४२/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सिरम इन्स्टिट्युटमध्ये फायनान्स मॅनेजर आहेत. तर सतीश देशपांडे (Satish Deshpande) हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. आदर पूनावाला यांच्या नंबरवरुन बनावट व्हॉटसअ‍ॅप मेसेज देशपांडे यांना आले. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीचे खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर कंपनीची फसवणुक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute) तपास करीत आहेत.0

Web Title :-  Pune Crime | Adar Poonawalla of Serum Institute bundgarden police station cheating case fraud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

Bank Account Minimum Balance | SBI-HDFC-ICICI Bank साठी मोठी बातमी, दंड वाचवण्यासाठी आजच करा हे काम

Pankaja Munde | भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे, पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी; पंकजा मुंडेंची नाराजी मावळणार?

Shinde Government | शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन आदेश जारी, थेट खात्यात रक्कम जमा होणार