Pune Crime | प्रेम विवाहानंतर 5 महिन्यात तरुणीची आत्महत्या, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने उचलले टोकाचं पाऊल

0
334
Pune Crime After 5 months of love Marriage wifes suicide than husband also
file photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेम विवाह (Love Marriage) केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात तरुणीने राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Committing Suicide) केली. ही घटना रविवारी (दि.10) चिंचवड (Chinchwad) येथे घडली. पत्नीने (Wife) आत्महत्या केल्यानंतर तिचा विरह सहन न झाल्याने पतीनेही (Husband) आज (बुधवार) डांगे चौकातील गणेशनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime)  केली.

 

अक्षय अंबिलवादे Akshay Ambilwade (वय – 25 रा. गणेशनगर, डांगे चौक) आणि अश्विनी जगताप – अंबिलवादे Ashwini Jagtap -Ambilwade (वय – 25) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आणि अश्विनी हे दोघे डांगे चौकातील (Dange Chowk) गणेशनगर येथे लहानाचे मोठे झाले. दोघांनीही खिंवसरा पाटील मराठी शाळेत (Khinvasara Patil in Marathi school) दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.(Pune Crime)

 

दरम्यान, त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले. त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. दोघांनी घरच्यांना विश्वासात घेऊन 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रेमविवाह केला. अक्षयला सराफाच्या दुकानात काम मिळाल्यानंतर ते दोघे चिंचवड येथे राहू लागले. दरम्यान, अश्विनीने राहत्या घरात रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष्यभर एकत्र राहण्याचे एकमेकांना वचन दिल्यानंतर अश्विनीने अचानक साथ सोडल्याने अक्षय पूर्णपणे खचला होता.

 

अश्विनीचा अंत्यविधी झाल्यानंतर तो आई – वडिलांसोबत डांगे चौकात आला होता.
तो आपल्या जीवाचे बरेवाईट करुन घेईल याची कल्पना त्याच्या मित्रांना होती. त्यामुळे त्याचे मित्र रात्रभर त्याच्याजवळ बसून होते.
आज सकाळी मित्र अंघोळीसाठी आपापल्या घरी गेल्यानंतर अक्षयने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | After 5 months of love Marriage wifes suicide than husband also

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा