Pune Crime | मुलाला कोयत्यासह पकडल्यानंतर बापाने चिंचवड पोलीस ठाण्यातच केली पोलिसांना मारहाण

पुणे / पिंपरी : Pune Crime | पोलिसांनी मुलाला कोयत्यासह पकडून पोलीस ठाण्यातील तपास पथकात आणल्यावर त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात शिरुन पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) लुकमान इस्माईल शेख (वय ५६, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) याला अटक केली आहे.

याबाबत पोलीस शिपाई अमोल माने (Police Amol Mane) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर लुकमान शेख (वय २२) याला तपास पथकाने कोयत्यासह ताब्यात घेऊन रविवारी दुपारी तपास पथकाच्या कार्यालयात आणले होते. त्यावेळी लुकमान शेख हे मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन तपास पथकाच्या कार्यालयात शिरले. फिर्यादी हे सरकारी कामकाज करीत असताना फिर्यादी यांच्या सहकार्‍यांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणून तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करतो, अशी धमकी दिली. चिंचवड पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कुदळे (PSI Kudale) तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 27060 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

High Return Stocks | ‘हे’ शेयर्स करताहेत पैशाचा वर्षाव! करा इथं ‘इन्व्हेस्ट’, एका झटक्यात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | After catching the boy with a scythe, the father beat the police at the Chinchwad police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update