Pune Crime | गुंगीचे औषध देऊन घरगड्यानेच केली तब्बल 24 लाखांची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंढवा पोलीस स्टेशनच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील फॉरेस्ट कॅसल सोसायटीमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. यामध्ये घरात काम करणाऱ्या विश्वासू घरगड्याने तब्बल 24 लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरून नेले आहेत. नरेश शंकर सौदा (वय 22) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती विहीन हुन (रा. प्रभादेवी मुंबई) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 4 डिसेंबर रोजी संपूर्ण प्रकार घडला. (Pune Crime)

याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रीती हुन या मुंबईतील प्रभादेवी परिसरात राहतात, तर त्यांचे आई-वडील मुंढवा परिसरातील फॉरेस्ट कॅसल सोसायटीत राहतात. आरोपी नरेश शंकर सौदा हा त्यांच्या घरात नोकर म्हणून काम करत होता. अनेक दिवसांपासून काम करत असल्याने त्याच्यावर कुटुंबाचा विश्वास बसला होता. (Pune Crime)

मात्र, 4 डिसेंबरच्या रात्री त्याने घरातील ज्येष्ठ सदस्यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले.
त्यानंतर हे दोघेही बेशुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतर घरातील लोखंडी पत्र्याचे कपाट उघडले आणि
त्यातून 286 ग्रॅम सोन्याचे, हिऱ्याचे दागिने आणि काही रोख रक्कम, अशी एकूण 23 लाख 98 हजार रुपयांची चोरी केली.

Web Title :- Pune Crime | after giving medicine from the meal take gold and silver ornaments worth 24 lakhs and spread them around the house mundhwa police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohandas Sukhtankar Passes Away | ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

HC On Minor Girl Rape Case | ‘अल्पवयीन मुलीच्या संमतीने शरीरसंबंध हा बलात्कारच’ – उच्च न्यायालय

Gold Silver Prices | सोने, चांदीच्या दरांत मोठी घट

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग