Pune Crime | एमपीएससी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, पुण्यात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एमपीएससी परीक्षेची (MPSC exam) तयारी करणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. स्वप्नील लोणकर याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या (commit suicide) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मल्हारी नामदेव बारवकर Malhari Namdev Barwakar (वय-25) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मल्हारी याने आज (शुक्रवार) सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या घरी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (MPSC Student Suicide) केली.

याबाबत मल्हारी बारवकर याचे चूलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी यवत पोलीस ठाण्यात (Yavat police station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारी हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षाची तयारी करत होता. त्याने या आधी तीने ते चार पेपर दिले आहेत. आता मल्हारी याची 2 जानेवारीला पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, सततच्या परीक्षा पुढे ढकलत असल्याने तो नाराज झाला होता. (pune Crime)

मल्हारी याच्या परीक्षा सरावासाठी त्याच्या वडिलांना जमीन विकली होती.
परीक्षा पुढे ढकलत असल्याने नैराश्येतून त्याने टोकाचे पाऊल उचलले.
आज सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मल्हारी हा एकुलता एक होता तर त्याची बहीण विवाहित आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | After mpsc student Swapnil Lonakar one more student Malhari Namdev Barwakar commit suicide in daund taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Thane-Diva corridor | 5 व्या आणि 6 व्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा धिम्या कॉरिडॉरवर 18 तासांचा ‘मेगाब्लॉक’; जाणून घ्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेनची यादी

Mouni Roy Bold Video Viral | मौनी रॉयनं हॉट ड्रेस घालून दाखवला बोल्ड अंदाज, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले – ‘ऑसम…’

 

Vicky Kaushal Airport Viral Video | विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येताच कैतरिनाच्या पतीनं केलं असं काही.. पाहा व्हायरल व्हिडिओ