Pune Crime | एजंट एकच फसवणुक करणार्‍या कंपन्या मात्र वेगवेगळ्या; परदेशात हॉलिडे होमच्या नावाखाली तरुणाला घातला गंडा

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वेगवेगळ्या कंपनीमार्फत तुम्हाला भेटवस्तू (Gift) देणार असल्याचे सांगून प्रेझेटेशनच्या नावाखाली देशा परदेशात फुकट सफर, राहण्याची सोय करणार असल्याचे आमिष दाखवून तरुणांना गंडा (Fraud Case) घालणार्‍या कंपनी व त्यांच्या एजंटवर नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे एजंट (Agent) वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका २७ वर्षाच्या शेतकर्‍याने नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२२) दिली आहे. त्यानुसार, अफताफ इरफान पठाण (Aftaf Irfan Pathan), श्वेता विरेंद्रकुमार जैस्वाल (Shweta Virendra Kumar Jaiswal), स्रेहल विरेंद्रकुमार जैस्वाल (Srehal Virendra Kumar Jaiswal), संदीप रमेश गुप्ता (Sandeep Ramesh Gupta), विजय चंद्रेपाल मेबाती Vijay Chandrepal Mebati (सर्व रा. मुंबई Mumbai) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर २८ एप्रिल २०२२ रोजी फोन आला होता. त्यात आमची अनंतारा हॉस्पिटॅलिटी कंपनी (Anantara Hospitality Company) असून कंपनीकडून गिफ्ट व्हाऊचर, हॉलिडे तिकीट (Holiday Ticket), गणपतीची चांदीची मूर्ती आणि किचन आर्टीकल सेट भेट देणार आहे. तुम्ही जयहिंद पॅलेस येथे या, असा निरोप दिला. त्यानुसार फिर्यादी गेले. तेथे त्यांना आरोपींनी आम्ही तुम्हाला भारत तसेच भारताबाहेर टुरवर फिरायला नेणार असल्याचे सांगून त्यासाठी ३० हजार रुपये भरायला सांगितले. त्यांनी पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडून मोबाईल घेतला. त्यांच्याकडून पासवर्ड विचारला. इंग्रजीमध्ये असलेल्या बाँड पेपरवर त्यांच्या सह्या घेतल्या. (Pune Crime)

त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ६०९० रुपये दोन महिने कपात करण्यात आले.
त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यावर त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन (Credit Card) ६० हजार रुपये काढण्यात आल्याची माहिती मिळाली.
यानंतर त्यांना ८ ऑगस्ट रोजी पुन्हा रेड सिझन हॉलिडेज (Red Season Holidays)
या नावाने कंपनीतून हॉटेल टकसन (Hotel Tucson) येथे बोलाविले असल्याचा फोन आला.
१३ ऑगस्ट रोजी ते हॉटेल टकसन येथे गेल्यावर त्याना संदीप गुप्ता व विजय चंद्रपाल मेबाती हे भेटले.
अनंतारा हॉस्पिटॅलिटीप्रमाणे त्यांनी या कंपनीची माहिती सांगून पैसे भरण्यास सांगितले.
अनंतारा हॉस्पिटॅलिटीच्या वेळी जे एजंट म्हणून अफताफ पठाण, श्वेता जैस्वाल, स्नेहल जैस्वाल हे ही यावेळी येथे होते.
तेव्हा फिर्यादी यांना खात्री पटली की अनंतारा हॉस्पिटॅलिटी व रेड सिझन हॉलिडेज हे दोन्ही एकच असून त्यांनी एक लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने नारायणगाव पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

 

Web Title :- Pune Crime | Agents same fraud companies but different;
In the name of holiday home abroad, the young man was raped

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा