क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | कौटुंबिक छळातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांना विमानतळ पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | माहेरहून दागिने (Jewelry), पैसे (Money) घेऊन येण्यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed Suicide). याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) पतीसह (Husband) तिघांना अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.

 

पती सागर देविदास पंडीत Sagar Devidas Pandit (वय -22), सासू शिला देविदास पंडित mother-in-law Shila Devidas Pandit (वय-55) आणि नंणद निर्मला देविदास आठवले Nirmala Devidas Athavale (वय -37, सर्व रा. राजीवनगर, साऊथ विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजना मनीष त्रिभुवन Sanjana Manish Tribhuvan (वय-19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई योगिता मनिष त्रिभुवन Yogita Manish Tribhuvan (वय 40, रा. रेसकोर्स, वानवडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी संजना आणि सागर पंडीत यांचा 14 जून 2021 रोजी विवाह झाला होता.
सागर याला फिरण्यासाठी होंडा मोटारसायकल पाहिजे, तसेच त्याच्या हातामध्ये अंगठी, सोन्याची चैन अशा वस्तू पाहिजे,
असे सांगून त्याकरीता तु तुझ्या आईवडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी संजनाकडे केली जात होती.
या कारणावरुन तिला वेळोवेळी मारहाण (Beating) करुन छळ केला जात होता.
या छळाला कंटाळून तिने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Airport police arrest three, including husband, for committing suicide due to domestic violence

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button