Pune Crime | अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकानेच घातला गंडा

पुणे : Pune Crime | अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Ajit Nagari Sahakari Patsanstha) शाखा व्यवस्थापकानेच इतरांच्या मदतीने बनावट पावत्या तयार करुन त्यावरील रजिस्टर मोबाईल नंबर बदलून ती दुसर्‍याच्या खात्यावर ट्रान्सफर करुन पतसंस्थेला गंडा (Fraud Case) घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

शाखा व्यवस्थापक अभिषेक संपत चोरघडे, कॅशियर सुंगधा बब्बे, लेखनिक अभिजित बनसोडे (सर्व रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Cheating Case)

याबाबत अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सतिश जाधव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६५४/२२) दिली आहे. हा प्रकार अजित पतसंस्थेच्या उरुळी देवाची (Uruli Devachi, Pune) शाखेत २० जुलै २०२० रोजी घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक चोरघडे हे शाखा व्यवस्थापक असताना त्यांनी कॅशियर, लेखनिक यांच्याशी संगनमत करुन एका महिलेच्या नावावर असलेली दामदुप्पट ठेव ठेवल्याची बनावट पावती तयार केली. ती मुदत संपण्यापूर्वीच पतसंस्थेत जमा करुन व अनिल पवार यांचे अकाऊंटचा रजिस्टर मोबाईल नंबर बदलून ती रक्कम अनिल शंकर पवार यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली. बनावट विड्राल स्लिपा भरुन खात्यावरुन ६ लाख २० हजार ५०७ रुपये काढून पतसंस्थेची फसवणूक (Cheating Case) केली. पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Ajit Nagari Sahakari Patsanstha Branch Manager Cheating Fraud Case Hadapsar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा